Header Ads

मुरगूडच्या मल्हार मेहतरला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा प्रथम पुरस्कार.

 मुरगूडच्या मल्हार मेहतरला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा प्रथम पुरस्कार.

***********************

मुरगूड/ जोतीराम कुंभार

**********************

संस्कार भवन विद्यालयातील इयत्ता आठवीचा विद्यार्थी मल्हार मेहतर याने शैक्षणिक क्षेत्रासोबतच अभिनयातही उल्लेखनीय यश संपादन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एनएमएमएस परीक्षेत ६० हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळवल्यानंतर आता त्याने ‘वाट’ या लघुपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा प्रथम पुरस्कार पटकावला आहे.

मल्हार हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणारा, प्रामाणिक, अभ्यासू आणि मनमिळावू विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. 

मुख्याध्यापिका योगिनी शेटे यांनी अभ्यासात सातत्य राखण्याचा शब्द घेत त्याला परवानगी दिली. त्यांचा विश्वास सार्थ ठरवत मल्हारने अभिनयासोबतच शिक्षणातही यश मिळवत एनएमएमएस शिष्यवृत्तीत ६० हजार रुपयांचे यश संपादन केले.

२८ वा चंद्रशेखर सांडवे प्रस्तुत सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार सोहळ्यात ‘वाट’ या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला, तर मल्हारला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला.

लॉकडाऊन काळात शाळा बंद असताना सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन शिक्षण व्यवस्थेमध्ये गरीब कुटुंबांतील आणि मोबाईल नेटवर्क नसलेल्या भागातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचे वास्तव चित्रण ‘वाट’ या लघुपटातून प्रभावीपणे करण्यात आले आहे. या लघुपटात मल्हारने साकारलेला अभिनय अत्यंत नैसर्गिक आणि हृदयस्पर्शी ठरला.

मल्हारच्या या यशामागे त्याचे पालक संदेश मेहतर, मुख्याध्यापिका योगिनी शेटे, शाळेचा सर्व स्टाफ तसेच संस्थेचे सेक्रेटरी संजय मंडलिक, कार्याध्यक्ष अँड.वीरेंद्र मंडलिक यांचे प्रोत्साहन लाभले.

No comments:

Powered by Blogger.