Header Ads

अपहरण प्रकरणी चार आरोपी अटक.

 अपहरण प्रकरणी चार आरोपी अटक.

**********************

    मुरगूड/ जोतीराम कुंभार

**********************

     कागल तालुक्यातील हमिदवाडा येथील राजेंद्र रामगोंडा जत्राटे यांच्याकडे शेअर मार्केटमध्ये गुंतवलेली रक्कम वसूल करण्यासाठी अपहरण आणि त्यांच्याकडून तीन लाखांची खंडणी वसूलप्रकरणी चौथ्या आरोपीला अटक करण्यात आली. दत्तात्रय उर्फ विशाल दत्तात्रय इंगळे (वय२४) रा. बेलवळे बुद्रुक ता. कागल असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.अटकेतील चारही आरोपींना ७ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारींनी सुनावली आहे.

    याबाबत मिळालेली माहिती अशी की राजेंद्र जत्राटे हे दोन वर्षांपूर्वी शेअर मार्केटींगचे काम करत होते सांगवडे ता. करवीर येथील तारा यादव या महिलेने जत्राटे यांच्याकडून ५०००० रु. गुंतवणूक केली होती. परंतु जत्राटे यांना शेअर मार्केटमध्ये तोटा झाल्याने त्यांनी तो व्यवसाय बंद केला तारा यादव यांनी जत्राटेकडून रक्कम परतीसाठी तगादा लावला होता .या रकमेच्या वसुलीसाठी सुपारी त्यांनी प्रवीण कांबळे व अतुल चांदणे यांच्याकडे दिली.

  प्रवीण आणि अतुल यांनी हमीवाड्यातून राजेंद्र जत्राटे यांचे अपहरण केले त्याला मारहाण करून डोळ्याला गंभीर दुखापत केली जत्राटे यांच्या तक्रारीवरून मुरगुड पोलिसांनी या अपहरण प्रसंगी अत्यंत थरारिकरित्या प्रवीण आणि अतुल यांना कोगनोळी टोल नाक्यावर ताब्यात घेतले झटापटीमध्ये पोलीस उपनिरीक्षक ए. एस. कुंडले यांच्या पायाला दुखापत झाली .पोलिसांनी रात्री उशिरा प्रवीण कांबळे (रा. सरवडे ता. राधानगरी), अतुल चांदणे (रा. बेलवळे बुदुक ता. कागल) हेमांशी यादव (रा. सांगवडे ता. करवीर) आणि इतर अनोळखी चौघे अशा सात जनाविरोधात मुरगूड पोलिसात गुन्हा नोंद केला आहे प्रवीण कांबळे अतुल चांदणे आणि हेमांशी यादव या तिघांना अटक केली आहे.

No comments:

Powered by Blogger.