विकास विद्यामंदिरसरनोबतवाडीची गुणवत्तेची नवी ओळख:
विकास विद्यामंदिरसरनोबतवाडीची गुणवत्तेची नवी ओळख:
बातमी: विकास विद्यामंदिर सरनोबत वाडीने गुणवत्तेची नवी ओळख निर्माण केली आहे.गडमुडशिंगी केंद्रांत इ.२ रीच्या वर्गात कु.कादंबरी विजय चव्हाण हिने १०० पैकी १०० गुण
मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर मिशन अंकुर प्रज्ञाशोध परीक्षेत तालुक्यातील टॉप २५ शाळांमध्ये विकास विद्यामंदिर सरनोबतवाडी शाळेतील इ.2 रीच्या वर्गाची निवड झाली आहे.
या शाळेतील इ.2 री (सेमी)च्या चिमुकल्या मुलांनी अंकुर प्रज्ञाशोध परीक्षेत गरुड भरारी घेतली आहे.
एकूण ३३ विद्यार्थ्यांपैकी २३ विद्यार्थी ७०+ व ९०+ चे एकूण १० विद्यार्थी चमकले आहेत.अंकुर प्रज्ञाशोध परीक्षा टॉप २५ शिक्षकांमध्ये इ.2 री चे वर्गशिक्षक काशिराम विठ्ठल बिरुणगी यांचा करवीर तालुक्यातील शिक्षक यादीत २१ वा क्रमांक असून केंद्र गडमुडशिंगी अंतर्गत प्रथम क्रमांक आला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक, पालक,शाळेचे मुख्याध्यापक, सह शिक्षक,शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सर्व सदस्य तसेच सरनोबतवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच, ग्रा.प. सदस्य व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.
फोटो ओळ: विकास विद्या मंदिर सरनोबतवाडी

No comments: