Header Ads

सातारा जिल्हा महिला पोलीस संघाचा वंडर वुमन्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत विजय ऍस्ट्रॉपॉड मैदानावर रंगलेल्या स्पर्धेत महिला पोलीस दलाची दमदार कामगिरी.

 सातारा जिल्हा महिला पोलीस संघाचा वंडर वुमन्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत विजय

ऍस्ट्रॉपॉड मैदानावर रंगलेल्या स्पर्धेत महिला पोलीस दलाची दमदार कामगिरी.

------------------------------

सातारा प्रतिनिधी: अमर इंदलकर 

------------------------

सातारा येथे आयोजित वंडर वुमन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा-2026 मध्ये सातारा जिल्हा महिला पोलीस संघाने उल्लेखनीय कामगिरी करत विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा दि. 20 एप्रिल ते 27 एप्रिल 2026 दरम्यान एस्ट्रॉपॉड मैदानावर पार पडली.

स्पर्धेदरम्यान सातारा जिल्हा महिला पोलीस दलातील खेळाडूंनी उत्कृष्ट संघभावना, शिस्त आणि खेळातील कौशल्याचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. अंतिम सामन्यात रोहिणी बाबर यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना ‘प्लेयर ऑफ द मॅच’ तर संपूर्ण मालिकेत उत्कृष्ट प्रदर्शनासाठी ‘प्लेयर ऑफ द सिरीज’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

संघातील माया महाडिक (कर्णधार), रोहिणी बाबर (उपकर्णधार), भावना जाधव, भारती जाधव, अर्चना जाधव, प्रफुल्ला गोंडस, रेखा सातपुते, दीपाली सावंत, अंजली कदम आदी खेळाडूंनी संघाच्या यशात मोलाची भूमिका बजावली.

या यशाबद्दल पोलीस अधीक्षक सातारा यांनी महिला पोलीस दलाचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले.

ही कामगिरी सातारा जिल्हा पोलीस दलासाठी अभिमानास्पद असून, महिला पोलीस दलाच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचे उत्तम उदाहरण ठरली आहे.

No comments:

Powered by Blogger.