जोतिबा यात्रेला संभाजीनगर एसटी आगारास ६ लाख ५० हजारांचे उत्पन्न — आगार व्यवस्थापक दयानंद पाटील यांची माहिती
जोतिबा यात्रेला संभाजीनगर एसटी आगारास ६ लाख ५० हजारांचे उत्पन्न
— आगार व्यवस्थापक दयानंद पाटील यांची माहिती.
-----------------------------------कोल्हापूर प्रतिनिधी विजय बकरे :
--------------------------------------
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध चैत्री जोतिबा यात्रेला यावर्षी संभाजीनगर एसटी आगाराला तब्बल ६ लाख ५० हजार रुपये उत्पन्न मिळाले असल्याची माहिती आगार व्यवस्थापक दयानंद पाटील यांनी दिली.
३० ते ३१ मार्च तसेच १ व २ एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीत यात्रेनिमित्त संभाजीनगर आगारातून ३५ एसटी बसेस कार्यरत ठेवण्यात आल्या. या बसच्या माध्यमातून एकूण ४०० फेऱ्या मारण्यात आल्या. या काळात सुमारे २० हजार प्रवाशांनी एसटी सेवेचा लाभ घेतला.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात वाढ झाली आहे. मागील वर्षी ३० बसेसच्या मदतीने ३०० फेऱ्या मारून ५ लाख ५० हजार रुपये उत्पन्न मिळाले होते. यावर्षी मात्र १ लाख रुपयांनी अधिक उत्पन्न नोंदवले गेले आहे.
या यशामध्ये बस स्थानक प्रमुख स्वप्निल पाटील, स्थानक प्रमुख सुरेश शिंगाडे, सहायक वाहतूक अधिकारी सौ. नीलप्रभा पाटील, तसेच गणेश कोळी, अरुण सरनाईक, प्रदीप पाखरे, अभिजीत चिले, बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज साळी आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे दयानंद पाटील यांनी सांगितले.
यात्रेदरम्यान प्रवाशांना सुरक्षित व वेळेवर सेवा देण्यासाठी एसटी प्रशासनाने केलेल्या नियोजनाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

No comments: