Header Ads

कोंडवे परिसरात मारहाण करून बुलेट चोरी; तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

 कोंडवे परिसरात मारहाण करून बुलेट चोरी; तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

-------------------------

सातारा जिल्हा प्रतिनिधी –

 अमर इंदलकर.

----------------------------

सातारा तालुक्यातील कोंडवे परिसरात तरुणाला मारहाण करून त्याची बुलेट व साहित्य लंपास करणाऱ्या तिघा आरोपींना सातारा तालुका पोलिसांनी अटक करत गुन्ह्याचा छडा लावला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १० एप्रिल २०२६ रोजी फिर्यादी शशिकांत रामचंद्र गोरे (वय ३१, रा. मेढा, ता. जावली) हे कोंडवे येथील स्वामी विवेकानंद नगर परिसरात असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांना मारहाण करून त्यांची बुलेट मोटारसायकल, मोबाईल चार्जर व बॅग असा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला होता. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

या गुन्ह्याचा तपास सुरू करताना पोलिसांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे दोन पुरुष व एका महिलेचा सहभाग निष्पन्न झाला. पोलिसांनी तत्काळ कोंडवे परिसरातून तिघांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये

केवल सत्यवान जाधव (वय २८, रा. केसरकर पेठ, सातारा),

विनायक राजाराम पोतदार (वय २५, रा. इस्लामपूर, ता. वाळवा)

आणि प्रणाली गजानन गंगावणे (वय २७, रा. शनिवार पेठ, सातारा) यांचा समावेश आहे.

आरोपींकडून बुलेट मोटारसायकल, मोबाईल चार्जर व बॅग असा सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन काटकर करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर व उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली.

दरम्यान, आरोपींना जलदगतीने अटक करून मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे कौतुक केले आहे.

No comments:

Powered by Blogger.