Header Ads

सावर्डे-आमतेवाडी येथे विविध विकासकामांचे उद्घाटन उत्साहात

 सावर्डे-आमतेवाडी येथे विविध विकासकामांचे उद्घाटन उत्साहात.

सावर्डे-आमतेवाडी येथे विविध विकासकामांचे उद्घाटन उत्साहात

------------------------------

बच्चे सावर्डे प्रतिनिधी.

 - सुनिल पाटील .

-----------------------------

सावर्डे-आमतेवाडी (ता. पन्हाळा) : ग्रामपंचायत सावर्डे-आमतेवाडी येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा सोहळा सोमवार, दि. १३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता उत्साहात पार पडला. पन्हाळा-शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. विनयरावजी कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते या विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले.

आमदार फडातून तसेच ग्रामपंचायत वित्त आयोगाच्या माध्यमातून ही विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामध्ये कुंभार गल्लीतील काँक्रिट रस्ता, पेव्हिंग ब्लॉक, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प ,ग्रामपंचायत व शाळा इमारत वरील सोलर प्रणाली,समाज मंदिर (बौद्ध विहार) इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामस्थांच्या सोयीसाठी वॉटर एटीएमचा शुभारंभही यावेळी करण्यात आला.

बौद्ध विहार उद्घाटन प्रसंगी वारणा बँकेचे संचालक विनायक बांदल, चंद्रकांत  बच्चे नवजीवन सोसायटी व कामधेनू दूध संस्थेचे चेअरमन, सरपंच बाळासो पाटील, उपसरपंच संजय पाटील,बाजीराव बच्चे, गुंडा यादव,वाहतूक संस्थेचे संचालक एच.आर.पाटील,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महादेव बच्चे,संभाजी पाटील,डॉ.उत्तम बच्चे,पोलीस पाटील सागर यादव,माजी उपसरपंच भारत यादव,प्रकाश बच्चे, डॉ. महादेव बच्चे,

पोपट बच्चे, हैबतराव यादव, बंडा यादव,

ग्रामपंचायत सदस्य जोतीराम घोलप,शिवाजी संकपाळ,जयश्री बांदल,शोभा यादव,वंदना यादव,ग्रामविकास अधिकारी लता कणसे कर्मचारी यांच्यासह सर्व बौद्ध समाजबांधव व ग्रामस्थ उपस्थित होते...

या विकासकामांमुळे गावाच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

No comments:

Powered by Blogger.