कुंभोज जि.प. मतदारसंघात बौद्ध बांधवांना शुभेच्छांचा वर्षाव
कुंभोज जि.प. मतदारसंघात बौद्ध बांधवांना शुभेच्छांचा वर्षाव
-----------------------------
हातकणंगले तालुका प्रतिनिधी.
महेश कांबळे .
----------------------------------
कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य शितलताई यादव व माजी सभापती प्रवीण अण्णा यादव यांनी मतदारसंघातील विविध भागांना भेट देत बौद्ध बांधवांना शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत सामाजिक ऐक्य व बंधुभावाचा संदेश दिला.
भेंडवडे येथे आयोजित कार्यक्रमात शितलताई यादव व प्रवीण अण्णा यादव यांनी बौद्ध समाजातील नागरिकांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. यावेळी परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या कार्यक्रमाला गोरख कांबळे, दिलीप कांबळे (सर), लखन कांबळे, महेश कांबळे, अतुल कसबेकर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनीही समाजात सलोखा व एकोप्याचे वातावरण टिकवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन प्रगती साधावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.

No comments: