Header Ads

कंथेवाडीत हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सुरुवात

 कंथेवाडीत हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सुरुवात

----------------------------------

राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे.

------------------------------------

  राधानगरी तालुक्यातील कंथे वाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ग्रामदैवत चिंचामाई मंदिरामध्ये सुरुवात करण्यात आला असल्याची माहिती प्राध्यापक बीके पाटील यांनी दिली

          कंथेवाडी  ग्रामदैवत चिंचमाई मंदिरात सात ते 14 एप्रिल अखेर अखंड हरिनाम व ज्ञानेश्वरी पारायण  सोहळा चैत्र कालावधीत संपन्न होणार असून यामध्ये काकडा, पारायण, हरिपाठ ,प्रवचन व किर्तन अशा भक्तिमय वातावरणात कार्यक्रम संपन्न होणार असून यामध्ये ह. भ. प तुकाराम नाना पाटील ,ह.भ.प सातापा माळवी. ह भ. प नामदेव पाटील, ह. भ. प धोंडीराम कांबळे, ह .भ .प युवराज वागरे, ह .भ. प बाजीराव पाटील आदींचे कीर्तन व प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

           हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने कंथेवाडी गाव  भक्तिमय बनले असून   ग्रामस्थ सर्व तरुण मंडळे व वारकरी संप्रदाय यांचे महत्त्वाचे योगदान राहणार आहे. तसेच या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन ह भ प तुकाराम पाटील यांनी केले आहे असल्याचे शेवटी प्राध्यापक बीके पाटील यांनी सांगितले

No comments:

Powered by Blogger.