Header Ads

चांदूर बाजारात अवैध गोवंश वाहतुकीवर मोठी कारवाई; १३.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त, एक जेरबंद

 चांदूर बाजारात अवैध गोवंश वाहतुकीवर मोठी कारवाई; १३.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त, एक जेरबंद .

-------------------------------

चांदूर बाजार प्रतिनिधी

मयुर खापरे .

------------------------------

| दि. 12 एप्रिल 2026

चांदूर बाजार पोलीस ठाणे हद्दीत अवैध गोवंश वाहतुकीवर पोलिसांनी धडक कारवाई करत १३ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (दि.12) कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर व नेताजी चौक येथे नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी दोन संशयित चारचाकी वाहनांना अडवून तपासणी केली. यामध्ये

 स्विफ्ट डिझायर (MH 01 CJ 4130)

 टाटा मांझा (MH 30 AA 0007)

या वाहनांमध्ये प्रत्येकी एक अशा दोन गोवंशांची अवैधरित्या वाहतूक सुरू असल्याचे उघडकीस आले.

या प्रकरणी पोलिसांनी सैयद मुजमील सैद यारीफ (वय 20, रा. रिहान पार्क, मोर्शी) याला अटक केली आहे. तसेच घटनास्थळावरून दोन मोबाईल, बनावट व टॅग नसलेले सुमारे 20 गोवंश असा एकूण ₹13,14,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई परि. सहायक पोलीस अधीक्षक सागर भामरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यामध्ये पोनि जाधव, सपोनि राठोड, पांडे, उमाडे तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

 अवैध गोवंश वाहतुकीविरोधात पोलिसांची ही कारवाई मोठी मानली जात असून, गुन्हेगारी प्रवृत्तीवर पोलिसांनी पुन्हा एकदा वचक बसवला आहे.

No comments:

Powered by Blogger.