Header Ads

गड मुडशिंगीत १२ तास अभ्यास करून विद्यार्थ्यांची महामानवांना अभिवादन महात्मा फुले, डॉ. आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अनोखी उपक्रम.

 गड मुडशिंगीत १२ तास अभ्यास करून विद्यार्थ्यांची महामानवांना अभिवादन

महात्मा फुले, डॉ. आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अनोखी उपक्रम.

----------------

कोल्हापूर प्रतिनिधी 

संस्कार कुंभार.

----------------


गड मुडशिंगी, दि. १२ एप्रिल २०२६ :

गड मुडशिंगी येथे महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी १२ तास सलग अभ्यास करून महामानवांना अनोख्या पद्धतीने मानवंदना अर्पण केली. हा उपक्रम स्वामी विवेकानंद अभ्यासिका यांच्या वतीने केंद्रीय प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आला होता.

इयत्ता ९ वीपासून पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. “अभ्यास हा बौद्धिक विकास, आत्मविश्वास आणि उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून शिस्त, धैर्य आणि वेळेचे व्यवस्थापन हे गुण अभ्यासातूनच विकसित होतात,” असे मार्गदर्शन विनय चंद्रकांत झिंजुर्के यांनी यावेळी केले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना महामानवांच्या विचारांची प्रेरणा देत स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी गणेश कांबळे, आयुष गवळी, ऋषिकेश पडवळ, राजू कांबळे, पाश्वराजदीप, महेंद्र कंबार, प्रसाद पवार, विनायक गवळी, रामा वडर, अमन कटगीरी, सुनील नेलॅ, पूजा पाटील आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमास सनी गोंधळी, संतोष कांबळे, भिमराव गोंधळी (रिपब्लिकन सेना करवीर तालुका अध्यक्ष), तानाजी गोंधळी (ब्लॅक पॅंथर उपाध्यक्ष), सचिन कांबळे, प्रशांत गोंधळी, सुजित कांबळे, अर्जुन कांबळे (महासचिव), महादेव कांबळे, संदिप गोंधळी, दिपक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.