चांदूरबाजार पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; CEIR पोर्टलद्वारे १९ हरवलेले मोबाईल मालकांना परत. सुमारे ३ लाखांहून अधिक किंमतीचे मोबाईल शोधून नागरिकांचा विश्वास जिंकला
चांदूरबाजार पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; CEIR पोर्टलद्वारे १९ हरवलेले मोबाईल मालकांना परत.
सुमारे ३ लाखांहून अधिक किंमतीचे मोबाईल शोधून नागरिकांचा विश्वास जिंकला.
------------------------
चांदूरबाजार प्रतिनिधी :
मयुर खापरे .
-------------------------
चांदूरबाजार पोलीस स्टेशनने CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या माध्यमातून हरवलेले मोबाईल शोधून काढत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. दि. ९ एप्रिल २०२६ रोजी मा. सहायक पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार एकूण १९ मोबाईल त्यांच्या मालकांना परत करण्यात आले.
या कारवाईत REDMI, VIVO, OPPO, Samsung, Lava तसेच Apple iPhone यांसारख्या विविध कंपन्यांचे मोबाईल हस्तगत करण्यात आले. या मोबाईलची एकूण किंमत अंदाजे ३ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अक्षय केतकर, सुनील बारस्कर, विनोद कापसे, निखिल खानझोडे, संतोष सोळंके यांच्यासह इतर अर्जदारांना त्यांचे मोबाईल परत मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
चांदूरबाजार पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून, हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी CEIR पोर्टलचा उपयोग करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

No comments: