Header Ads

पणुत्रेच्या सरपंचपदी येसाबाई कांबळे 317 मतांच्या मताधिक्याने विजयी ..

 पणुत्रेच्या सरपंचपदी येसाबाई कांबळे 317 मतांच्या मताधिक्याने विजयी ...्

----------------

कळे प्रतिनिधी 

साईश मोळे.

------------------

कळे  -पणुत्रे ( ता. पन्हाळा ) ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदासाठीच्या पोटनिवडणुकीत ज्योतिर्लिंग समस्त गावकरी आघाडीच्या येसाबाई केशव कांबळे यांची तब्बल  317 मतांच्या मताधिक्याने सरपंचपदी निवड झाली. त्यांना 763 मध्ये मिळाली तर विरोधी उमेदवार शुभांगी सदाशिव कांबळे यांना 446मते मिळाली.

सन 2022 मध्ये झालेल्या लोकनियुक्त सरपंच पदाच्या निवडणुकीच्या वेळी सर्व गाव एकत्र येऊन राजकीय गट तट न मानता  निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरवून प्रथम छाया कांबळे यांना व नंतर येसाबाई कांबळे यांना संधी देण्याचे ठरले होते. मात्र सर्व गावकरी एकत्र असूनही एका उमेदवाराने अर्ज भरल्याने निवडणूक लादली गेली होती. मात्र मोठ्या मतांच्या फरकाने छाया शिवाजी कांबळे यांची सरपंचदी निवड झाली होती. त्यानंतर अडीच वर्षांनी सौ. कांबळे यांनी सरपंच पदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर अविश्वास दाखल झाला होता. अविश्वास दाखल होताच सौ कांबळे यांनी राजीनामा दिला.

आताच्या निवडणूकीत आधी ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार येसाबाई कांबळे यांचाच उमेदवारी अर्ज भरणे अपेक्षित असताना काही लोकांनी विरोधाला विरोध म्हणून शुभांगी कांबळे यांचा अर्ज दाखल केला. त्यामुळे निवडणूक अटळ बनली.गाव कमिटीच्या विरोधात अपप्रचार करण्यात आला. मात्र जनतेने जे ठरलय ते ठरलय म्हणत गाव कमिटीच्या उमेदवार येसाबाई कांबळे यांना 1215 पैकी 763 मते दिली तर विरोधी उमेदवार शुभांगी कांबळे यांना 446 मतावर समाधान मानावे लागले.

निकालानंतर सौ. कांबळे यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत हलगीच्या कडकडाटत विजयी मिरवणूक काढली. अवघ्या दीड वर्षाचा अल्पकालावधी शिल्लक असतानाही विकास कामे खेचून आणू असा विश्वास विजयी उमेदवार येसाबाई कांबळे यांनी विजयानंतर व्यक्त केला.

No comments:

Powered by Blogger.