पणुत्रेच्या सौरभ पाटील यांना जर्मनीतील विद्यापीठाची पीएचडी.
पणुत्रेच्या सौरभ पाटील यांना जर्मनीतील विद्यापीठाची पीएचडी.
----------------------------गगनबावडा प्रतिनिधी
साईश मोळे.
------------------------
९८९०९०८०४७
कळे:- पणुत्रे ( ता. पन्हाळा ) येथील सौरभ प्रकाश पाटील यांना जर्मनीतील युनिव्हर्सिटी ऑफ कॉन्स्टन्झ या विद्यापीठाची फिजिक्स मधील 'सुपरकंडक्टविटी ' या विषयावर पीएचडी प्राप्त झाली. समतल चुंबकीय क्षेत्राखाली असलेल्या इसिंग सुपरकंडक्टिंग प्रणालीचा वर्णक्रमीय आणि परिवहन गुणधर्म ' हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. प्रोफेसर वोल्फगॅंग बेल्झीग हे त्यांचे मार्गदर्शक आहेत.
श्री. पाटील यांचे आजपर्यंत तीन रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण पणुत्रे येथील प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण न्यू मॉडेल स्कूल कोल्हापूर तर विवेकांनंद कॉलेज मध्ये उच्च माध्यमिक शिक्षण झाले. त्यांनी भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था ( आयसर) पुणे मधून बी. एस. एम. एस. ही पदवी प्राप्त केली. सॉरबॉन युनिव्हसिर्टी पॅरीस फ्रान्स येथे पदवी प्रबंध पूर्ण केला. नंतर ते पीएचडीसाठी जर्मनीला गेले.
११वी पासूनच संशोधन क्षेत्रात जायचे त्यांचे स्वप्न होते. संयम जिद्द चिकाटी यांच्या जोरावर त्यांनी हे यश प्राप्त केले. त्यांना वडील प्राथमिक शिक्षक प्रकाश पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.

No comments: