Header Ads

चांदेकरवाडी येथे शेतीपंप व पाईपलाईनची अज्ञान व्यक्तीकडून तोडफोड; चोरीचा प्रयत्न अयशस्वी

 चांदेकरवाडी येथे शेतीपंप व पाईपलाईनची अज्ञान व्यक्तीकडून तोडफोड; चोरीचा प्रयत्न अयशस्वी.

-----------------------------------

राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे.

------------------------------------

राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी येथील बामणाचा माळ परिसरात अज्ञात व्यक्तींनी शेतातील पंप व पाईपलाईनची मोडतोड करून चोरीचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही बाब आज सकाळी शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, येथील शेतकरी दिलीप पांडुरंग खोत यांच्या शेतात बसविण्यात आलेल्या ३ एचपी क्षमतेच्या मोटरला जोडलेले इलेक्ट्रिक कनेक्शन, फ्युज बॉक्स, वायर तसेच पाणीपुरवठ्यासाठी असलेली पाईपलाईन अज्ञात चोरट्यांनी पूर्णपणे नुकसानग्रस्त केली आहे. मोटर २०२१ साली बसविण्यात आली होती.

चोरट्यांनी साहित्य चोरून नेण्याचा प्रयत्न केला असावा; मात्र काही कारणास्तव तो प्रयत्न अयशस्वी ठरला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या तोडफोडीत अंदाजे १५ ते २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधितांनी पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींना शोधून कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच शेतमाल व शेती उपकरणांच्या सुरक्षेबाबत तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

No comments:

Powered by Blogger.