Header Ads

मलकापूर–अनुस्कुरा मार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत 55 वर्षीयाचा मृत्यू

 मलकापूर–अनुस्कुरा मार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत 55 वर्षीयाचा मृत्यू

-------------------------------------

मलकापूर प्रतिनिधी : रोहित पास्ते.

---------------------------------------

मलकापूर–अनुस्कुरा मार्गावर उचत (ता. शाहूवाडी) परिसरात भरधाव कारच्या धडकेत कासार्डे येथील जगन्नाथ बापू कांबळे (वय 55) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 28 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजण्यापूर्वी मलकापूर–अनुस्कुरा उचत रस्त्यावर ओढ्या जवळ हा अपघात झाला. संशयित आरोपी सिद्धेश मधुसुदन सालेलकर (रा. हौसिंग बोर्ड कॉलनी, उत्तर गोवा) याच्या ताब्यातील MH 12 NX 8748 क्रमांकाच्या ह्युंदाई एक्सेंट कारने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालविल्याने रस्त्यालगत असलेल्या जगन्नाथ बापू कांबळे (रा. कासार्डे, ता. शाहूवाडी) यांना जोरदार धडक दिली. या धडकेत कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेचा पुढील तपास शाहूवाडी पोलीस करत आहेत.

या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून निष्काळजी वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांतून होत आहे.

No comments:

Powered by Blogger.