एचआयव्ही संसर्गितासाठी विहान ठरले माहेर घर: हक्काच्या जोडीदाराची योग्य निवड ठरली सासर
एचआयव्ही संसर्गितासाठी विहान ठरले माहेर घर: हक्काच्या जोडीदाराची योग्य निवड ठरली सासर.
------------------------कोल्हापूर ;प्रतिनिधी.
------------------```--
एचआयव्ही संसर्गित व्यक्तींच्या आयुष्यात सुखाची नवी पहाट फुलावी आणि त्यांना हक्काचा जोडीदार मिळावा, या सामाजिक भावनेतून 'एन के पी प्लस विहान प्रकल्प' वतीने शाहू स्मारक भवन येथे एक दिवसीय विवाह परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विविध जिल्ह्यातील एच आय व्ही संसर्गित विवाहइच्छुक तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते 'वृक्षाला पाणी घालून' करण्यात आली.जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी प्रबोधन आणि मार्गदर्शन केले. सुनीता पाटील यांनी विहान या संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. संजय सावुळ यांनी एच. आय व्ही संसर्गित वधू- वर मेळाव्याची माहिती दिली.
प्रमुख पाहुणे संजय देशपांडे म्हणाले की, "एचआयव्ही सह जीवन जगणाऱ्या व्यक्तींनाही सामान्य नागरिकांप्रमाणेच वैवाहिक सुखाचा आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, या मोफत मेळाव्यांची आज समाजाला मोठी गरज आहे.
या कार्यक्रमासाठी युवा ग्रामीण विकास संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक मोहन सातपुते,सावित्रीबाई फुले ए.आर.टी. सेंटरचे समुपदेशक संदीप पाटील, सीपीआर आय सी टी चे समुपदेशक मकरंद चौधरी उपस्थित होते. तसेच संस्थेच्या अध्यक्षा वैशाली बगाडे, अवनी भारमल. भाग्यश्री पंडीत,यशवंत पाटील, संदीप कोल्हे, आशिष खरबडे , संदीप साळोखे, संदीप शेट्ये आणि स्नेहल मोघे यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन विजय प्रधान यांनी केले, आभार जान्हवी पवार यांनी मानले.
फोटो ओळ: एच. आय. व्ही सह जीवन जगणाऱ्या युवक युवतीसाठी मोफत वधू वर परिचय मेळाव्या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना संजय देशपांडे ,अध्यक्षा वैशाली बगाडे, यशवंत पाटील आदी.

No comments: