Header Ads

मुरगुड मधील महाडायलिसिस सेंटरमुळे मूत्रपिंड रुग्णांना दिलासा मिळेल. मंत्री हसन मुश्रीफ

 मुरगुड मधील महाडायलिसिस सेंटरमुळे मूत्रपिंड रुग्णांना दिलासा मिळेल.मंत्री हसन मुश्रीफ.

___________________

मुरगुड /जोतीराम कुंभार.

----------------------------

मुरगुड हे परिसरातील खेड्यांचे मध्यवर्ती केंद्र असल्यामुळे या रुग्णालयाला वेगळा दर्जा देण्याचा प्रयत्न राहील. तसेच मुरगूडकडे माझे लक्ष राहणारच आहे . मी स्व. सदाशिवराव मंडलिक यांच्यामुळे ६ वेळा आमदार, मंत्री झालो आहे. मुरगूड नगरपरिषदेने राजकीय अभिनिवेष बाजूला ठेवून विकास कामासाठी प्रस्ताव द्यावेत त्या मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

            येथील मुरगूड ग्रामीण रुग्णालयात महाडायलेसिस केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. खास. संजय मंडलिक होते. यावेळी दिलीप माने , सरिता थोरात , जि.प अध्यक्षा शिल्पा खोत, नगराध्यक्षा सुहासिनीदेवी पाटील , उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले , मुख्याधिकारी अतिश वाळुंज , ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ रविंद्र कनाडे यांची प्रमुख उपस्थिती होती .

           यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, मुरगूड परिसरातील सुमारे ५० गावांचे मुरगूड केंद्र असल्याने या डायलेसिस केंद्रामुळे रुग्णांचे प्राण वाचणार आहेत. मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयातील हेरिटेज इमारतीत दवाखाना हलवून ५० खाटाच्या दवाखान्यासाठी लवकरच इमारत बांधकाम करण्यात येणार आहे.

             यावेळी माजी खास. संजय मंडलिक म्हणाले , स्व. सदाशिवराव मंडलिक यांनी तत्कालिन आरोग्यमंत्री विमल मुंदडा यांच्या कडून मुरगूडला विशेष बाब म्हणून ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले होते . त्यामुळे मुरगूड परिसरातील ४० व भुदरगड तालुक्यातील १० गावातील लोकांची आरोग्याची सोय झाली . यावेळी त्यांनी ५० गावांचे केंद्र असलेल्या मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात १०० खाटांची सुविधाची गरज असल्याचे सांगितले . तसेच आदमापूर येथील बाळु मामांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांचे अपघाताचे प्रमाण वाढले आहे . त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात आर्थोपेडिकची सुविधा सुरू केल्यास रुग्णांचे प्राण वाचणार आहेत .

             यावेळी रुग्णकल्याण समिती सदस्य रणजित सुर्यवंशी, बी एम पाटील , बिद्री संचालक सुनील सुर्यवंशी , रंगराव पाटील , माजी सरपंच देवानंद पाटील, पं समिती सदस्या रुपाली आंगज , माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके , नगरसेवक राजु आमते, शिवाजी चौगले, सुहास खराडे , दत्तात्रय मंडलिक यांचासह सर्व आजी माजी नगरसेवक , विविध गावचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक दिलीप माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले . तर जिल्हा शल्य चिकित्सक सरीता थोरात यांनी आभार मानले .

    ..........................…..............      

         मुश्रीफ मंडलिक एकत्र - तापमान ४४ वर

       यावेळी संजय मंडलिक यांनी आम्ही दोघे एकत्र कार्यक्रमाला उपस्थित आहे म्हटल्यावर उष्णतेचा पारा आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहून  तापमान ४४ वर गेले असावे असे म्हणताच सभागृहात हास्य कल्लोळ झाला .


     

           मुरगूडकडे दुर्लक्ष होतय !

मंत्री मुश्रीफ यांचे कागल व गडहिंग्लज नगरपरिषदेकडे अधिक लक्ष आहे . त्यामानाने त्यांचे मुरगूडकडे मात्र दुर्लक्ष होतय असा चिमटा यावेळी बोलताना संजय मंडलिक यांनी काढला .

No comments:

Powered by Blogger.