Header Ads

मरळी येथे भीषण अपघात; तरुण डॉक्टरांचा मृत्यू..

 मरळी येथे भीषण अपघात; तरुण डॉक्टरांचा मृत्यू

साळवणसह संपूर्ण गगनबाडा तालुक्यावर शोककळा...


--------------------------

पन्हाळा-माधुरी मस्कर.

--------------------------

कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावरील मरळी ( ता. पन्हाळा ) येथे आज पहाटे दीडच्या सुमारास  झालेल्या ट्रक व मोटारच्या भीषण अपघातात मोटार मधील एकाचा  अपघात स्थळीच मृत्यू झाला.  डॉ. सुनील नंदगांवकर ( वय -२९,रा. मणदूर  पैकी धुमाळवाडी, ता. गगनबावडा )  असे मृत व्यक्तीचे नाव आहे.  दरम्यान, अपघातामध्ये मोटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  कळे  पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून ट्रक चालक संतोष विठ्ठल पाटील ( वय २७, रा. गुडमाकेरी, ता. सौंदती, जि. बेळगांव ) यास  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

  याबाबतची कळे  पोलीस व अपघात स्थळावरून मिळालेले माहिती अशी  करूळ घाटमार्गे कोल्हापूरवरून   सौंदती, जि. बेळगावकडे  निघालेला चिऱ्याने  भरलेला ट्रक व कोल्हापूरवरून मंणदूर पैकी धुमाळवाडी ता. गगनबावडाकडे निघालेली मोटार यांच्यामध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत डॉ. नंदगावकर हे जागीच ठार झाले.  अपघातानंतर  सोळा चाकी ट्रक रस्त्यावरून सुमारे दहा फूट खाली गेला.  तर आलिशान मोटारीचे मोठे नुकसान झाले.  

 अपघातातील मृत  डॉ. सुनील  सुरेश नंदगावकर यांचा साळवण    ता. गगनबावडा येथे दवाखाना आहे.  शिवाय ते कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात सेवा बजावत होते.  सोमवारी रात्री दीडच्या सुमारास ते ड्युटी वरून घरी परतत असताना दीडच्या सुमारास हा अपघात झाला. 

    अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांचे वडील सुरेश नंदगावकर यांनी आपल्या मुलाला वैद्यकीय शिक्षण दिले होते.   डॉ. सुनील यांनीही वडिलांचा विश्वास सार्थ ठरवत वैद्यकीय शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून साळवण   ता. गगनबावडा )येथे दवाखाना सुरु  केला होता.  अत्यंत मनमिळावू व तरुण डॉक्टरांच्या मृत्यूने साळवण परिसरासह गगनबावडा  तालुक्यात हळहळ  व्यक्त  होत आहे. 

 त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

No comments:

Powered by Blogger.