Header Ads

फर्स्ट वंडर फायर स्केटर चॅम्पियनशिप, स्वराज्य रोलर स्केटिंग अकॅडमी संलग्न आईस स्केटिंग असोसिएशन कोल्हापूर यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा..

 फर्स्ट वंडर फायर स्केटर चॅम्पियनशिप, स्वराज्य रोलर स्केटिंग अकॅडमी संलग्न आईस स्केटिंग असोसिएशन कोल्हापूर यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा.

_____________________

कोल्हापूर जिल्हा प्रतीनिधी.
रहिम पिजारी.
--------------------------------

कोल्हापूर : इंटरनॅशनल स्कूल उचगाव येथे भरविण्यात आल्या. 

या स्पर्धेचे उद्घाटन उचगाव ग्रामपंचायत चे लोकनियुक्त सरपंच श्री मधुकर चव्हाण साहेब तसेच उचगाव ग्रामपंचायत चे सर्व सदस्य , सांगली जिल्ह्याचे नगरसेवक श्री आशिष साळुंखे, स्केटिंग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री सुरज शिंदे सर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेमध्ये विविध जिल्ह्यातून तसेच कर्नाटक भागातून मुलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. चॅम्पियनशिप मध्ये पहिल्या पाच क्रमांक देण्यात आले त्यामध्ये चॅम्पियनशिप ट्रॉफी प्रदान करण्यात आली . प्रथम क्रमांक कोल्हापूरच्या जयराम जाधव यांच्या जे जे रोलर स्केटिंग अकॅडमी यांनी बहुमान मिळवला ,.द्वितीय क्रमांक सचिन टीम टॉपर्स ,तृतीय क्रमांक सई स्केटिंग अकॅडमी सांगली , उत्तेजनार्थ महात्मा गांधी रोलर स्केटिंग अकॅडमी व एजे रोलर स्केटिंग अकॅडमी गडिंग्लज यांना देण्यात आला. संजय टीम जमखंडी यांना  प्रोत्साहन  सन्मान देण्यात आला. कोल्हापूर ,सांगली, बेळगाव ,कर्नाटक ,गडहिंग्लज, मिरज अशा बऱ्याच जिल्ह्यातील मुले उत्साहाने सहभाग घेतला. तसेच स्वराज्य रोलर स्केटिंग अकॅडमीच्या ही मुलांनी घवघवीत यश मिळवले, यामध्ये सर्व मुलांना मेडल्स व ट्रॉफी प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये देवांश चव्हाण, अथर्व चव्हाण, दर्शन निर्मळे, रणविजय चव्हाण, अथर्व जाधव, हर्ष जाधव, आराध्या परब, हर्षल काशीद, प्रज्ञेश शृंगारे, श्लोक हेरलेकर, अभिमन्यू पाटील, स्वरा दोडमनी, तसेच स्पेशल चाईल्ड या मुलांनमध्ये राष्ट्रीय खेळाडू सिद्धार्थ काळे , व निर्भय जाधव यांनी उत्कृष्ट स्केटिंग करून सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे नियोजन स्वराज्य रोलर स्केटिंग अकॅडमी अध्यक्ष श्री विजय जाधव सर , उपाध्यक्ष रोहन माने, खजिनदार नजीर मदार, सदस्य श्री दीपक मसेकर(कृषी अधिकारी), श्री नंदकुमार मजगे व सेक्रेटरी तसेच एन आय एस आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व पंच सौ शुभांगी कांबळे मॅडम यांनी बहुमूल्य सहकार्य केले. तसेच सर्व स्वराज्य रोलर स्केटिंग अकॅडमी चे पालक विद्यार्थी यांचे मोलाचे योगदान लाभले.

No comments:

Powered by Blogger.