सांगली एलसीबीची कारवाई; नशेसाठी वापरली जाणारी ७४ इंजेक्शन्स जप्त
सांगली एलसीबीची कारवाई; नशेसाठी वापरली जाणारी ७४ इंजेक्शन्स जप्त.
--------------सांगली : जिल्ह्यात वाढत्या नशेखोरीविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडक कारवाई करत नशेसाठी वापरली जाणारी ट्रेमीमाईड औषधी इंजेक्शन्स जप्त केली. आष्टा परिसरातून दोन आरोपींना ताब्यात घेत १ लाख २६ हजार ७६६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १०६/२०२५ अन्वये बीएनएस कलम २७८, ३(५) तसेच औषधीद्रव्ये व सौंदर्यप्रसाधन अधिनियम १९४० कलम १८(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अभिषेक भिमराव सरवदे (वय २६, रा. शिराळकर कॉलनी, आष्टा) आणि रेहान रफीक मुजावर (वय २०, रा. गोडे चौक, आष्टा) अशी आहेत.
मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी विशेष पथक तयार केले होते.
पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार आष्टा हद्दीतील घाटगे मळा परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी यूनिकॉर्न मोटारसायकलवरून आलेल्या दोन संशयितांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात ट्रेमीमाईड औषधी द्रव्याची ७४ इंजेक्शन्स आढळून आली.
चौकशीत आरोपींनी ही इंजेक्शन्स इंडिया मार्ट अॅपवरून ऑनलाईन मागवल्याची कबुली दिली. तरुण वर्गात नशा आणि उत्तेजक म्हणून या इंजेक्शनची मागणी असल्याने अधिक दराने विक्री करण्याचा त्यांचा उद्देश होता, असे तपासात निष्पन्न झाले.
या कारवाईत २६ हजार ७६६ रुपयांची इंजेक्शन्स आणि १ लाख रुपयांची होंडा यूनिकॉर्न मोटारसायकल जप्त करण्यात आली असून पुढील तपास आष्टा पोलीस ठाणे करीत

No comments: