Header Ads

सातवे येथे पालवी संस्थेच्या अनाथ मुलांचे जल्लोषात स्वागत.

सातवे येथे पालवी संस्थेच्या अनाथ मुलांचे जल्लोषात स्वागत.

-------------------
सुनील पाटील.
------------------

सातवे तालुका पन्हाळा येथे श्री आळोबानाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या अभिनव उपक्रमांतर्गत पंढरपूर येथील पालवी संस्थेतील अनाथ मुलांचे रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.

पालवी संस्थेची ट्रॅव्हल्स सकाळी अकरा वाजता सातवे येथे पोहोचताच गावकऱ्यांनी दिंडीच्या माध्यमातून मुलांचे जल्लोषात स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात आणि टाळ-मृदुंगाच्या निनादात गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

यानंतर गावातील महिला व पालकांनी मुलांचे औक्षण करून प्रेमाने स्वागत केले. प्रत्येक मुलाला पूर्वनियोजनानुसार गावातील कुटुंबांकडे प्रेमाने नेण्यात आले. “मामाच्या गावच्या सुट्टी”चा आनंद अनुभवण्यासाठी आलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्सुकता पाहायला मिळत होती.

या उपक्रमामुळे अनाथ मुलांना कुटुंबातील प्रेम, आपुलकी आणि ग्रामीण संस्कृतीचा अनुभव मिळणार असून गावकऱ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. श्री आळोबानाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

No comments:

Powered by Blogger.