Header Ads

तळवडे येथे कारची मोटारसायकलला धडक; दोघे जखमी

 तळवडे येथे कारची मोटारसायकलला धडक; दोघे जखमी.

--------------------------------------

मलकापूर प्रतिनिधी : रोहित पास्ते.

--------------------------------------

    कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावरील तळवडे येथे कारने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार सतिश मारुती मोरे (वय ३८, रा. आंबेवाडी ता. पन्हाळा) व कार चालक दिलीप दत्तात्रय सरोळकर (वय ५५, रा. देवरुख) हे जखमी झाले. गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. याबाबतची नोंद शाहूवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

शाहूवाडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सतिश मोरे हे मोटारसायकलवरून आंब्याकडे जात होते. तर दिलीप सरोळकर हे कारने कोल्हापूरहून देवरुखकडे निघाले होते. तळवडे परिसरात कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कारने समोरील मोटारसायकलला जोरदार धडक दिली.

या अपघातात मोरे यांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली असून कार चालक सरोळकर हेही जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींवर आंबा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

No comments:

Powered by Blogger.