ठाणे-आळवे कासारी धरण संस्थेच्या अध्यक्षपदी सत्यवान पाटील तर उपाध्यक्षपदी दिलीप पाटील.
ठाणे-आळवे कासारी धरण संस्थेच्या अध्यक्षपदी सत्यवान पाटील तर उपाध्यक्षपदी दिलीप पाटील.
उपाध्यक्ष.दिलीप पाटील
--------------------------
पन्हाळा-पतिनिधी.
सौ.माधुरी मस्कर.
----------------------------
ठाणे-आळवे कासारी नदी सहकारी धरण सोसायटी कसबा ठाणे च्या अध्यक्षपदी सत्यवान अनिल पाटील तर उपाध्यक्षपदी दिलीप विष्णू पाटील यांची निवड संस्थेच्या कार्यालयामध्ये नुकतीच पार पडली....
पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे येथील ठाणे- आळवे कासारी नदी सहकारी धरण संस्थेची अध्यक्ष,उपाध्यक्ष निवड नुकतीच पार पडली. यावेळी सर्वानुमते कसबा ठाणे येथील संस्थेचे युवा संचालक सत्यवान अनिल पाटील व पुशिरे येथील दिलीप विष्णू पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकारी संस्था पन्हाळा येथील एस पी पाटील होते. निवडीनंतर नूतन अध्यक्ष सत्यवान पाटील म्हणाले की, धरण दुरुस्तीचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. काम सुरू करत असताना सभासदांना शेतीसाठी पाणी कमी पडणार नाही याची काळजी घेतली जाईल. त्याच पद्धतीने सभासदांनी सुद्धा संस्थेला सहकार्य करणे अपेक्षित आहे. सर्व संचालक व सभासद त्याचबरोबर ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्येष्ठ संचालक यांना विश्वासात घेऊनच आपण काम करणार असल्याचे यावेळी सत्यवान पाटील यांनी सांगितले. यावेळी कसबा ठाणे येथील स्नेहदीप पाटील, ए.बी.पाटील दिगवडे येथील पोलीस पाटील नंदकुमार पाटील, रणजीत पाटील, संग्राम पाटील आळवेचे येथील शिवाजी बंगे बी. डी. पाटील त्याचबरोबर ज्येष्ठ संचालक बळवंत गायकवाड, तुकाराम पाटील, युवराज पाटील यांच्यासह धरण संस्थेचे सर्व संचालक, सभासद यांच्यासह मॅनेजर वैभव पाटील, क्लार्क सागर यादव, कुंडलिक यादव, अमर पाटील उपस्थित होते उपस्थित होते...


No comments: