शिवपार्वती मेडिकल्सच्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १०० नागरिकांनी घेतला लाभ
शिवपार्वती मेडिकल्सच्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १०० नागरिकांनी घेतला लाभ.
--------------------------------------------बच्चे सावर्डे प्रतिनिधी – सुनिल पाटील.
-------------------------------------------
सातवे येथील शिवपार्वती मेडिकल्सच्या २९ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात तब्बल १०० नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला.
शिबिरामध्ये ब्लड, शुगर व बी.पी. तपासणी करण्यात आली. तसेच उन्हाच्या वाढत्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना ओआरएस लिक्विड व जंतनाशक गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. तज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शनही केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती पन्हाळा सदस्य मा. माणिक पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण जाधव, पोलीस पाटील डॉ. स्वाती निकम, डॉ. शिवप्रसाद पाटील, डॉ. संदीप जाधव, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. प्रसाद लठ्ठे, डॉ. एम. व्ही. पाटील, डॉ. संतोष निकम, डॉ. ब्रम्हानंदिनी पाटील, डॉ. अनिल सावंत, रामदास निकम, सुषमा निकम, बाळासाहेब नंदुरकर, मेजर अजित कणसे, आयआयटी बॉम्बे येथे शिक्षण घेत असलेले सोहम निकम, पार्थ पाटील, ओंकार तोडकर, पत्रकार दिनकर पाटील, सुनिल पाटील, संगीता यमगर यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केदारलिंग क्लिनिक लॅबोरेटरी सातवेच्या पूजा पाटील व वैष्णवी गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले. सातवे व परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत शिवपार्वती मेडिकल्सचे आभार मानले.

No comments: