Header Ads

“इंधन दरवाढीने संतप्त शिवसैनिक रस्त्यावर; उंचगावात ‘रास्ता रोको’ने महामार्ग ठप्प”

 “इंधन दरवाढीने संतप्त शिवसैनिक रस्त्यावर; उंचगावात ‘रास्ता रोको’ने महामार्ग ठप्प”

गॅस सिलेंडरला हार, केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी; वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा.

---------------------------------
 कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी.
शशिकांत कुंभार.
--------------------------------

कोल्हापूर : पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि वाढत्या महागाईच्या निषेधार्थ करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उंचगाव येथे आक्रमक आंदोलन छेडत कोल्हापूर-हुपरी मार्ग रोखला. अचानक झालेल्या रास्ता रोकोमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली आणि वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या.

शिवसैनिकांनी दुचाकी वाहन व गॅस सिलेंडरला प्रतीकात्मक हार घालत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला. “महागाईने जनता होरपळली”, “दरवाढ कमी करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत, “गेल्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेल दरात सात रुपयांपर्यंत वाढ झाली असून सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे,” असा आरोप केला.

आंदोलनात पोपट दांगट, विशाल देवकुळे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. केंद्र सरकारने तात्काळ दरकपात करावी, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

No comments:

Powered by Blogger.