Header Ads

निमसाखरमध्ये स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी; ग्रामप्रदक्षिणा, प्रवचन व महाप्रसाद.

 निमसाखरमध्ये स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी; ग्रामप्रदक्षिणा, प्रवचन व महाप्रसाद.

---------------------------------------------

इंदापूर तालुका | प्रतिनिधी – गणेश धनवडे

------------------------------------------------

इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने गावातून श्रींची भव्य ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत धार्मिक वातावरणात कार्यक्रम पार पडला.

गावातील स्वामीभक्त महिलांनी चौका-चौकात आकर्षक रांगोळ्या काढून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे स्वागत केले. महादेव भजनी मंडळाने दिंडीत सहभाग घेत भक्तिरस निर्माण केला.

पालखी मंदिरात आल्यानंतर सायंकाळी ८ ते ९ या वेळेत ह.भ.प. श्री रेवणसिद्ध सलगर महाराज (पंढरपूर) यांचे स्वामी चरित्रावर प्रभावी प्रवचन झाले. त्यानंतर जप व आरती संपन्न झाली. कार्यक्रमाच्या शेवटी श्री आप्पासाहेब तुळशीराम बोंद्रे यांच्या वतीने सर्व स्वामीभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी गावातील स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. रांगोळी सेवेची जबाबदारी सौ. शीतल सुनील सुतार यांनी पार पाडली, तर फुलांची सेवा श्री महादेव मारुती माळी यांनी दिली. प्रवचन सेवेचे मानधन श्री राजाराम संभाजी जाधव यांनी दिले.याच वेळी निमसाखर गावचे दिव्यांग पत्रकार कु. गणेश धनवडे यांना ह.भ.प. श्री रेवणसिद्ध सलगर महाराज यांच्या हस्ते ‘स्वामी सेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

No comments:

Powered by Blogger.