राधानगरी तहसील कार्यालयात ६७ वा कामगार दिन उत्साहात; ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात..
राधानगरी तहसील कार्यालयात ६७ वा कामगार दिन उत्साहात; ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात.
----------------------------------------
राधानगरी | प्रतिनिधी – विजय बकरे.
------------------------------------------
तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या राधानगरी येथील तहसील कार्यालयाच्या पटांगणात १ मे रोजी ६७ वा कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वज फडकावून करण्यात आली. त्यानंतर राधानगरी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी तहसीलदार अनिता देशमुख यांना मानवंदना दिली. पुढे जागृती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर करून वातावरण देशभक्तीमय केले.
या कार्यक्रमास तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार, कर्मचारी, पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच विविध शाळांचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामगार दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे श्रमिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत समाजात एकात्मतेचा संदेश देण्यात आला.

No comments: