तालुकास्तरीय निर्माण झालेले प्रश्न सोडवण्यासाठीच तालुकास्तरीय आढावा बैठक.
तालुकास्तरीय निर्माण झालेले प्रश्न सोडवण्यासाठीच तालुकास्तरीय आढावा बैठक
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जासमीन.
------------------------------------
मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते.
-------------------------------------
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जे काही प्रश्न निर्माण झाले असतील ते त्या त्या तालुका स्तरावरती सोडवण्यासाठी तालुकास्तरीय आढावा बैठकीचे नियोजन केले असून यामध्ये प्रत्येक खात्याच्या खाते प्रमुखाचा आढावा घेऊन तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांच्याशी समन्वयक साधून तालुक्यातील प्रत्येक प्रश्नांची सोडवणूक केली जाईल असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन यांनी शाहुवाडी येथे पार पडलेल्या एक पाऊल प्रगतीकडे... अध्यक्षांचा दौरा तालुक्याकडे... या उपक्रमा अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुका आढावा बैठकीत केले.
यावेळी त्यांनी बोलताना सांगितले पावसाळ्यापूर्वी तालुक्यातील नागरिकांचे संरक्षण सार्वजनिक, आरोग्य, शेती, रस्ते वीज आणि पाणीपुरवठा सुरक्षित ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने नियोजनबद्ध पूर्वतयारी करावी. संभाव्य दरड कोसळणे, वीज अपघात, आणि साथीचे रोग, रस्ते तुटणे आणि पिण्याच्या पाण्याची प्रदूषण यासारख्या समस्या कमी करण्यासाठी तसेच नादुरुस्ती इमारतीमध्ये शाळा व अंगणवाडी भरवण्यात येऊ नये. इमारतींची तपासणी छत, गळती अतिवृष्टी, वीज जोडणी, परिसर स्वच्छता करावी तसेच ग्रामसभेद्वारे नागरिकांना नैसर्गिक आपत्ती काळामध्ये नागरिकांची काळजी घ्यावी.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, उप जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील, बांधकाम व शिक्षण सभापती शितल यादव, समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, जि. प. सदस्य सर्जेराव पाटील, अमरसिंह पाटील, स्नेहल वेल्हाळ ,राजकुवर गायकवाड ,उपसभापती अमर खोत, माधुरी पाटील ,अभयसिंह चौगुले, लक्ष्मी पाटील, सुरेश पवार, गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील, कक्ष अधिकारी संजय अवघडे, तालुका वैद्यकीय अधिकारी एच. आर. निरंकारी, विस्तार अधिकारी पराग कानडे, यावेळी ग्रामसेवक तसेच सर्व खात्याचे खाते प्रमुख उपस्थित होते. आभार उपसभापती अमर खोत यांनी मानले.

No comments: