औषधे दुकाने बंद कालावधीत नियंत्रण कक्ष स्थापन
औषधे दुकाने बंद कालावधीत नियंत्रण कक्ष स्थापन.
-------------------------------------------कुपवाड मिरज:- प्रतिनिधी राजु कदम.
-------------------------------------------
सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : सांगली जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट संघटनेकडून दिनांक २० मे २०२६ रोजी जिल्ह्यातील औषध दुकाने बंद ठेवून ऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अॅंड ड्रगिस्ट यांनी पुकारलेल्या एक दिवसीय बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे कळविले आहे. या बंदच्या कालावधीत जिल्ह्यातील रुग्णांच्या अत्यावश्यक व तात्काळ उपचारासाठी त्यांना औषधे त्वरित उपलब्ध व्हावीत व औषधाविना कोणत्याही रुग्णाच्या जीवितास धोका पोहोचू नये म्हणून सहाय्यक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन, सांगली या कार्यालयात एक दिवसीय नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आलेला असून औषधाच्या बाबत ९५५२९२८११३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा, असे सहायक आयुक्त (औषधे) अ. स. गोडसे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

No comments: