Header Ads

“ईश्वरपूरमध्ये पिस्टलसह रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद; सांगली एलसीबीची धडाकेबाज कारवाई”

 “ईश्वरपूरमध्ये पिस्टलसह रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद; सांगली एलसीबीची धडाकेबाज कारवाई”

-----------------------------
 सांगली मिरज कुपवाड.
 प्रतिनिधी.
राजू कदम.
-------------------------

सांगली : ईश्वरपूर येथील उदय चौक परिसरात अवैध पिस्टल घेऊन फिरणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले. आरोपी अबुबकर हरुणरशीद मणेर (रा. ईश्वरपूर) याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. आरोपीकडे शस्त्राचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले असून त्याने हे पिस्टल ओळखीच्या व्यक्तीकडून घेतल्याची कबुली दिली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे व सहायक पोलीस निरीक्षक लहु थाटे यांच्या पथकाने केली.

No comments:

Powered by Blogger.