कोलोली येथील वृद्ध महिलेची आजारपणाला कंटाळून आत्महत्या..
कोलोली येथील वृद्ध महिलेची आजारपणाला कंटाळून आत्महत्या.
------------------------------कोलोली तालुका पन्हाळा येथील सौ पार्वती चंद्रकांत जाधव (वय 70 )या महिलेने आजारपणाला कंटाळून कासारी नदीत( घाटावर )आत्महत्या केली आहे
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे सौ पर्वती जाधव झोपल्या पण सकाळी उठून पाहील्यानंतर त्या अंतरुणावर दिसल्या नाहीत घरातील मंडळींनी याबाबत शोधशोध केली दरम्यान घाटावर त्यांची चप्पल दिसल्याने पुढे त्यांचा मृतदेह दिसला याबाबत पोलीस पाटील शुभांगी जाधव यांना कळविण्यात आले त्यांनी पन्हाळा पोलीस स्टेशनला याबाबतची मोबाईल वरून माहिती दिली तसेच त्यांचे जावई जयसिंग श्रीपती पाटील आणि पन्हाळा पोलीस स्टेशनला वर्दी दिली
थोड्या वेळात पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील व अनिल पाटील घटनास्थळी दाखल झाले मृतदेह पाण्यातून बाहेर काढला पंचनामा करून मृतदेहत्तरणीय तपासणीसाठी पन्हाळा ग्रामीण रुग्णालयाला पाठवण्यात आला याबाबत पन्हाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून कोलोली बीटचे बीट अंमलदार शहाजी फोंडे अधिक तपास करत आहेत
त्यांच्या पश्चात एक मुलगा पती एक मुलगी सुन व नाततवंडे असा परिवार आहे
फोटो
पार्वती जाधव

No comments: