अवैध शस्त्रविक्रीचा डाव उधळला! दोन देशी पिस्टलसह तरुण अटकेत; साथीदार फरार
अवैध शस्त्रविक्रीचा डाव उधळला! दोन देशी पिस्टलसह तरुण अटकेत साथीदार फरार.
----------------------------
सातारा जिल्हा प्रतिनिधी .
अमर इंदलकर.
-------------------------
कराड : सातारा स्थानिक गुन्हे शाखेने कराड तालुक्यात धडक कारवाई करत अवैध शस्त्रविक्रीचा मोठा प्रयत्न उधळून लावला. या कारवाईत एका तरुणाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा एकूण १ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कराड–पाटण रोडवरील दुर्गामाता हॉटेल परिसरात सापळा रचला होता. संशयित युवकाला पकडण्याचा प्रयत्न होताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला जेरबंद केले.
अटक आरोपीचे नाव सुमित युवराज साठे (वय २२, रा. साजूर, ता. कराड, जि. सातारा) असे असून, त्याचा साथीदार सुरज ऊर्फ चिक्या जगन्नाथ मोहिते (रा. सोहोली, ता. कडेगाव, जि. सांगली) हा फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
चौकशीत आरोपीने ही शस्त्रे विक्रीसाठी आणल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी कराड तालुका पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.

No comments: