डी.सी. नरके विद्यानिकेतन, कुडित्रेचा HSC निकालात दमदार यश कला ८९.२८%, विज्ञान ९९.३४% तर व्होकेशनल ९६.७७% निकाल.
डी.सी. नरके विद्यानिकेतन, कुडित्रेचा HSC निकालात दमदार यश कला ८९.२८%, विज्ञान ९९.३४% तर व्होकेशनल ९६.७७% निकाल.
----------------
कुडित्रे प्रतिनिधी.
पीजी पाटील सर.
------------------
कुडित्रे (ता. करवीर) : कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डी.सी. नरके विद्यानिकेतन व ज्युनियर कॉलेज, कुडित्रे येथील इयत्ता बारावी (HSC) मार्च २०२६ परीक्षेचा निकाल उत्कृष्ट लागला असून तिन्ही विभागांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.
कला विभागाचा निकाल ८९.२८% लागला असून या विभागातून कु. शुभांगी भिकाजी पाटील हिने ७७.८३% गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. कु. साक्षी शशिकांत पाटील (७२.८३%) व कु. आर्या अमर जाधव (६९.५०%) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
विज्ञान विभागाने तब्बल ९९.३४% निकालाची नोंद केली. या विभागात कु. सिद्धी संदीप खाडे हिने ५४० गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले. कु. शरयू शैलेश खाडे (८८.५०%) व कु. उपेंद्र श्रीनिवास तेलसंग (८८.००%) यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली.
व्होकेशनल विभागाचा निकाल ९६.७७% लागला असून कु. श्रावणी संदीप पाटील (८०.८३%), कु. रिया प्रकाश पाटील (८०.६७%) व कु. प्रतिक्षा सरदार साबळे (८०.००%) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळवले.
या यशस्वी विद्यार्थ्यांना कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व सदस्य तसेच प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments: