सांगलीत मोटारसायकल चोरीचे ३ गुन्हे उघड; रेकॉर्डवरील गुन्हेगार अटकेत १.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त; LCB ची कारवाई.
सांगलीत मोटारसायकल चोरीचे ३ गुन्हे उघड; रेकॉर्डवरील गुन्हेगार अटकेत १.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त; LCB ची कारवाई.
-------------------------
सांगली मिरज कुपवाड.
प्रतिनिधी राजू कदम.
-------------------------
सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) सांगली यांनी धडक कारवाई करत मोटारसायकल चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक करून तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपीकडून एकूण १ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक आरोपीचे नाव विनायक बजरंग खुटाळे (वय ३२, रा. अभिनंदन कॉलनी, शिंदे मळा, सांगली) असे आहे. दि. ३० एप्रिल २०२६ रोजी उद्योग भवन परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
चौकशीत आरोपीने भवान हॉस्पिटलसमोरील रोडवरून दि. २५ एप्रिल रोजी मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. तसेच सांगली व मिरज एस.टी. स्टँड परिसरातून आणखी दोन मोटारसायकली चोरी केल्याचेही उघड झाले.
या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाणे (गु.र.नं. १३१/२०२६), सांगली शहर पोलीस ठाणे (गु.र.नं. ११६/२०२६) आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे (गु.र.नं. ११५/२०२६) येथे बी.एन.एस. कलम ३०३(२) अन्वये गुन्हे नोंद आहेत.
आरोपीकडून दोन काळ्या रंगाच्या हिरो स्प्लेंडर प्लस व एक सिल्व्हर रंगाची हिरो स्प्लेंडर अशा तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत १,५५,००० रुपये आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार व त्यांच्या पथकाने केली.
दरम्यान, आरोपीवर यापूर्वीही सांगली व सोलापूर जिल्ह्यात घरफोडी व वाहनचोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहे.

No comments: