Header Ads

छतावर खेळताना विजेचा घातक शॉक; इंगळीतील ९ वर्षीय सानवी कांबळेचा मृत्यू.

 छतावर खेळताना विजेचा घातक शॉक; इंगळीतील ९ वर्षीय सानवी कांबळेचा मृत्यू

इंगळी गावावर शोककळा; हसतमुख शाळकरी मुलीचा दुर्दैवी अंत.

बोरगाव / प्रतिनिधी :

खेळत असताना विजेचा धक्का बसून घराच्या छतावरून खाली कोसळल्याने नऊ वर्षीय बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चिकोडी तालुक्यातील इंगळी येथे मंगळवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कुमारी सानवी कांबळे (वय ९) ही इंगळी प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीत शिक्षण घेत होती. मंगळवारी सायंकाळी ती घराच्या छतावर खेळत असताना अचानक विजेचा जोरदार शॉक बसला. या धक्क्यामुळे तिचा तोल जाऊन ती छतावरून खाली कोसळली.

गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या सानवीला तात्काळ नजिकच्या दवाखान्यात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी केलेल्या उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणाची नोंद अंकली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व संबंधित अधिकारी करीत आहेत.

सानवी ही स्वभावाने मनमोकळी, हसतमुख आणि सर्वांशी प्रेमाने वागणारी मुलगी होती. तिच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण इंगळी गावात शोककळा पसरली आहे.

No comments:

Powered by Blogger.