Header Ads

इचलकरंजीच्या इंदिरा गांधी रुग्णालयाच्या सुविधा वाढीसाठी मुंबईत उच्चस्तरीय बैठक; तातडीने कार्यवाहीचे आदेश.

 इचलकरंजीच्या इंदिरा गांधी रुग्णालयाच्या सुविधा वाढीसाठी मुंबईत उच्चस्तरीय बैठक; तातडीने कार्यवाहीचे आदेश.

--------------------

इचलकरंजी/ प्रतिनिधी :

लखन जाधव.

---------------------

इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय येथील विविध सेवा-सुविधांच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य भवन, आरोग्यसेवा आयुक्तालय, मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख शासकीय रुग्णालयांपैकी एक असलेल्या या रुग्णालयात इचलकरंजी, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यासह आसपासच्या भागातील हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. वाढत्या रुग्णभाराच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील सेवा अधिक सक्षम करण्याची गरज बैठकीत ठळकपणे मांडण्यात आली.

यावेळी रुग्णालयासाठी अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे, तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे, तसेच विविध वैद्यकीय सेवा आणि पायाभूत सुविधा बळकट करण्याबाबत सविस्तर मागणी करण्यात आली. रुग्णांना दर्जेदार आणि तातडीने उपचार मिळावेत, यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्यावर भर देण्यात आला.

या मागण्यांची गांभीर्याने दखल घेत आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

बैठकीस आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच संबंधित पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.