काटेभोगाव येथे ‘जागर समता-बंधुत्वाचा’ कार्यक्रम उत्साहात.
काटेभोगाव येथे ‘जागर समता-बंधुत्वाचा’ कार्यक्रम उत्साहात.
-----------------------------------कळे प्रतिनिधी : साईश मोळे.
------------------------------------
पन्हाळा तालुक्यातील काटेभोगाव ग्रामपंचायतीच्या वतीने भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा जागर करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. समता दिंडी, बंधुत्व दालन, रांगोळी स्पर्धा आणि खुले चर्चासत्र अशा उपक्रमांत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना अभिवादन करून झाली. समता दिंडीदरम्यान संविधान आणि सामाजिक एकतेचे संदेश देण्यात आले. विविध ठिकाणी दिंडीचे स्वागत करण्यात आले असून ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.
बंधुत्व दालनाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती मा. रवींद्र पाटील यांच्या हस्ते झाले. चर्चासत्रात मान्यवरांनी गावातील एकता, विकास आणि सामाजिक सलोखा यावर विचार मांडले. तसेच रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.
समाजात समता व बंधुभाव वाढविणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत असून संविधानिक मूल्यांचा प्रभावी संदेश देणारा आदर्श कार्यक्रम म्हणून त्याची चर्चा होत आहे.

No comments: