Header Ads

सेवानिवृत्त मुख्याध्यापक केरबा श्रीपती नाळे यांचे निधन वयाच्या ७५ व्या वर्षी काळाने घेतली झडप

 सेवानिवृत्त मुख्याध्यापक केरबा श्रीपती नाळे यांचे निधन वयाच्या ७५ व्या वर्षी काळाने घेतली झडप.

-----------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी विजय बकरे.

-------------------------------------

करवीर तालुक्यातील सांगरूळ येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक केरबा श्रीपती नाळे यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी अकस्मित निधन झाले. त्यांच्या निधनाने सांगरूळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शिक्षण क्षेत्रात त्यांनी अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावत विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. शांत, संयमी व शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती.

ते डॉ. महेश नाळे आणि गारगोटी येथील महिला उद्योजिका सौ. विद्या माणगांवकर यांचे वडील होत. तसेच ग्राम महसूल अधिकारी सौ. मेघा जाधव-नाळे यांचे ते सासरे होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम सोमवार दि. १८ मे रोजी सकाळी ९ वाजता सांगरूळ, ता. करवीर येथे होणार आहे.

No comments:

Powered by Blogger.