Header Ads

जिद्दीला मिळाले यश! २०२० पासूनच्या संघर्षानंतर रूथ सकटे पोलीस भरतीत चमकली

 जिद्दीला मिळाले यश! २०२० पासूनच्या संघर्षानंतर रूथ  सकटे पोलीस भरतीत चमकली.

------------------------------.
शशिकांत कुंभार.
--------------------
गांधीनगर: गांधीनगर परिसरात राहणारी कु. रूथ गीता राजेंद्र सकटे हिने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस भरती प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सन २०२० पासून सातत्याने प्रयत्न करत अखेर तिने यश मिळवत आपल्या स्वप्नांना गवसणी घातली आहे.

नवी मुंबई येथे झालेल्या पोलीस भरतीत महिला राखीव प्रवर्गामध्ये तिने एकूण १४ उमेदवारांपैकी ८ वा क्रमांक पटकावत आपल्या कुटुंबाचे व परिसराचे नाव अभिमानाने उज्ज्वल केले आहे.

या यशामागे तिची आई गीता राजेंद्र सकटे व सरदार मित्तभ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच तिने जिद्द न सोडता अथक परिश्रम करून हे यश संपादन केले.

तिच्या या कामगिरीमुळे गांधीनगर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

No comments:

Powered by Blogger.