Header Ads

स्वर्गीय सभापती विश्वासराव दादा रणसिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन..

 स्वर्गीय सभापती विश्वासराव दादा रणसिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन.

-------------------------------

इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे.

----------------------------------

इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती तथा इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे  संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय विश्वासराव दादा  रणसिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता. इंदापूर महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले.

इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे  उपाध्यक्ष  प्रकाश  कदम,संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.यावेळी प्राचार्य डॉ.अशोक काळंगे,उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग,उपप्राचार्य डॉ.प्रशांत शिंदे इ मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवर यांनी त्यांच्या कार्याची आठवण काढत कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहिली.

संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांनी सांगितले की, आजोबा स्वर्गीय कृष्णाजी रणसिंग यांचा सन १९६२ पासून सहकार क्षेत्रात सुरु झालेला राजकीय प्रवास पुढे वडील स्वर्गीय विश्वासराव दादा रणसिंग यांनी इंदापूर पंचायत समिती मध्ये आपल्या कार्यकाळात सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रात भरीव योगदान दिले.त्यांनी ग्रामीण भागातील कृषी विकासाला अफार्म च्या माध्यमातून चालना देत अनेक उपक्रम राबविले.आज तिसरी पिढी राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे.

विशेषतः शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. इंदापूर तालुक्यात कळंब येथे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय तसेच तावशी व म्हसोबाचीवाडी येथे माध्यमिक विद्यालयांची उभारणी करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.त्यांच्या या प्रयत्नांमुळे मुलीच्या दृष्टीने शैक्षणिक सुविधा निर्माण झाली.अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आले असून आज विविध क्षेत्रात यश संपादन करत आहेत.

कृषी क्षेत्रातही त्यांनी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन, पाणी व्यवस्थापन आणि शेतीपूरक उपक्रम राबवून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे काम केले. सामाजिक क्षेत्रात त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. 

संस्था उपाध्यक्ष प्रकाश कदम यांनी दादानी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करीत असताना सदैव लोकहिताचा व जनसेवेचा विचार केला.सर्व क्षेत्रात अष्टपैलू असणारे व्यक्तीमत्व दादामध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्राचार्य अशोक काळंगे,प्रा.डॉ.विजय केसकर,उपप्राचार्य डॉ.प्रशांत शिंदे ,उपप्राचार्य डॉ.ज्ञानेश्वर गुळीग यांनी आपल्या मनोगतातून स्व. रणसिंग यांच्या साध्या, कर्तव्यदक्ष आणि जनतेशी नाळ जुळलेल्या व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख केला. “त्यांचे कार्य हे पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल,” असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन प्रा.सोनाली चव्हाण व आभार प्रा.ज्ञानेश्वर गुळीग यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमास प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.