Header Ads

गुरुदेव सेवा मंडळात सर्वांना सामावून घेण्याची क्षमता आहे!: जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे यांचे प्रतिपादन. .

 गुरुदेव सेवा मंडळात सर्वांना सामावून घेण्याची क्षमता आहे!:

जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे यांचे प्रतिपादन. .

-----------------------

सिद्धार्थ कदम

पुसद तालुका प्रतिनिधी.

----------------------------

पुसद :-राष्ट्रसंतांनी विश्वाला मंदिर व मानवात देव समजून महान कार्य केले ते कृतिशील संत होते राष्ट्रासाठी भरीव कार्य केल्यामुळे त्यांना राष्ट्रसंत उपाधी मिळाली त्यांनी दिलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना प्रणालीत सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात त्यामुळे गुरुदेव सेवा मंडळात सर्वांना सामावून घेण्याची क्षमता आहे असे प्रतिपादन भीम टायगर सेना जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे यांनी ग्रामजयंती निमित्त होणाऱ्या सुसंस्कार शिबिर उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून केले.

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ११७ वी जयंती अर्थात ग्रामजयंती निमित्त होणाऱ्या सुसंस्कार शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. अध्यक्षस्थानी श्रीरामपूरचे प्रशासक आशिष काळबांडे, प्रमुख अतिथी संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष सुधीर देशमुख, ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूल प्राचार्य राजेश प्रजापती, भीम टायगर सेना जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे, उपकार्यकारी अभियंता आशिष राजुरकर, उपकार्यकारी अभियंता अमोल देऊळकर, रिपब्लिकन वार्ता न्यूज चे विदर्भ उपसंपादक राजेश ढोले उपस्थित होते.

. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व आसन पूजन करून राष्ट्रसंतांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना व ग्रामगीता ग्रंथ अध्याय वाचन करण्यात आला. मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका प्रचार प्रमुख ग्रामगीताचार्य गजानन कवाने यांनी प्रास्ताविकातून सेवा मंडळाच्या कार्याची व राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सुधीर देशमुख प्राचार्य राजेश प्रजापती प्रशासक आशिष काळबांडे यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रसंतांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी जिल्हाध्यक्ष कांबळे पुढे म्हणाले की राष्ट्रसंतांनी जातीयता, अंधश्रद्धा,अज्ञान,आळस यांचा विरोध केला व देशसेवा व जनता जनार्दनाच्या सेवेत आपले आयुष्य खर्ची घातले,गुरुदेव सेवा मंडळाने सेवेचे व्रत अंगिकारले, त्यामूळे एवढे मोठे कार्य घडून येते यावेळी त्यांनी भोंदू बुवा,मांत्रिक यांच्यावर कडाडून प्रहार केला.

यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रसंताची भजने साग्रसंगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष गणेश धर्माळे यांनी तर आभारप्रदर्शन तालुका सेवाधिकारी शिवशंकर नागरे यांनी केले, राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरुदेव सेवा मंडळ श्रीरामपूरच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी पुसद तालुक्यातील निवडक भजनी मंडळे असंख्य स्त्री पुरूष आबालवृद्ध मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.