Header Ads

पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा; अखेर ऊसाच्या शेतातून आरोपी जेरबंद!”

 “पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा; अखेर ऊसाच्या शेतातून आरोपी जेरबद.!

-------------------------

सातारा जिल्हा.

अमर ईदलकर.

-------------------

सातारा जिल्ह्यातील डीपी चोरी प्रकरणातील तब्बल पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला वाठार पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत अटक केली. लखन रमेश भोसले (रा. भुरकरवाडी, ता. फलटण) असे अटक आरोपीचे नाव आहे.

आरोपी गावात आल्याची माहिती मिळताच वाठार व लोणंद पोलिसांच्या संयुक्त पथकाने सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने ऊसाच्या शेतातून पळ काढला. मात्र जवळपास एक किलोमीटर पाठलाग करून पोलिसांनी त्याला जेरबंद केले.

या कारवाईमुळे वाठार पोलिसांच्या धाडसी कामगिरीचे कौतुक होत असून पुढील तपास पोहवा किशोर गिरी करीत आहेत.

No comments:

Powered by Blogger.