पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षकपदी शुभम कुमार यांची नियुक्ती.
पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षकपदी शुभम कुमार यांची नियुक्ती.
राज्यातील पोलीस दलातील मोठ्या फेरबदलात अचलपूर येथून बदली.
पुणे (प्रतिनिधी -कैलास बोडके )- राज्यातील पोलीस दलात करण्यात आलेल्या मोठ्या फेरबदलात अमरावती, अचलपूर येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांची पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गृह विभागाने यासंदर्भातील आदेश नुकतेच जारी केले.
पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांची उप आयुक्त, सागरी सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभाग या पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या जागी शुभम कुमार यांची नियुक्ती झाली आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी सध्या संदीप सिंग गिल्ल कार्यरत आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून शुभम कुमार त्यांना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत करतील.
या फेरबदलात पुणे शहर व ग्रामीण पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. संजय दराडे यांची पुणे शहर सहपोलीस आयुक्तपदी तर तेजस्वी सातपुते यांची पुणे शहर गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

No comments: