Header Ads

मरळी येथे विवाहितेची आत्महत्या

 मरळी येथे विवाहितेची आत्महत्या.

-------------------------------

पन्हाळा-माधुरी मस्कर .

-----------------------------

मरळी (ता. पन्हाळा ) येथे एका २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सानिका अक्षय पोवार (वय २२) असे मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत कळे पोलीस ठाण्यात बीएनएसएस कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. ५ मे २०२६ रोजी दुपारी ०१ च्या सुमारास  सानिका पोवार यांनी आपल्या राहत्या घरी पहिल्या मजल्यावर फॅनच्या हुकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच त्यांना तातडीने कोल्हापूर येथील सी.पी.आर. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. याबाबतची माहिती सी.पी.आर. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका यांनी पोलिसांना दिली.  आत्महत्येचं  नेमकं कारण समजू शकले नाही.  त्यांच्या पश्चात पती, मुलगा,  आई,,वडील,सासू-सासरे, एक भाऊ असा परिवार आहे 

या प्रकरणी पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक दीपक  कदम करत आहेत.

No comments:

Powered by Blogger.