Header Ads

“रियल सिंघम”ची कणेरी वाडीत धडक; JCB ने उद्ध्वस्त केल्या गावठी दारूच्या भट्ट्या.

 “रियल सिंघम”ची कणेरी वाडीत धडक; JCB ने उद्ध्वस्त केल्या गावठी दारूच्या भट्ट्या.

गोकुळ शिरगाव पोलिसांची मध्यरात्री कारवाई; बेकायदेशीर दारू व्यवसायावर मोठा आळा.

-----------------

हलसवडे प्रतिनिधी.

 हर्षवर्धन आचार्य.

------------------

कणेरी वाडी (ता. करवीर) | 

कणेरी वाडी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी दारू निर्मितीवर गोकुळ शिरगाव पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत संपूर्ण भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. एपीआय रविराज फडणीस यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नियोजनबद्ध छापा टाकून दारू निर्मितीचा मोठा साठा उध्वस्त केला.

या कारवाईदरम्यान दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन, ड्रम व अन्य साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतर JCB च्या सहाय्याने दारू भट्ट्या व साठा पूर्णपणे नष्ट करण्यात आला. या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर दारू व्यवसायाला मोठा आळा बसल्याचे चित्र आहे.

स्थानिकांकडून मिळालेल्या तक्रारींनंतर पोलिसांनी ही कारवाई आखली होती. अचूक माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास गोकुळ शिरगाव पोलीस करत आहेत.

एपीआय रविराज फडणीस हे कर्तव्यदक्ष व धाडसी अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी यापूर्वीही अनेक प्रभावी कारवाया करत कायदा व सुव्यवस्था राखली आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे परिसरात त्यांना “रियल सिंघम” अशी ओळख मिळाली आहे.

या धाडसी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून पोलिसांच्या कारभाराचे स्वागत केले आहे.

No comments:

Powered by Blogger.