Header Ads

हुपरीतील शिवमहोत्सव परिवाराचे अविरत कौतुकास्पद कार्य : अनेक गरजू रुग्णांना मोफत रक्तदान..

 हुपरीतील शिवमहोत्सव परिवाराचे अविरत कौतुकास्पद कार्य : अनेक गरजू रुग्णांना मोफत रक्तदान .

-------------------------------

हुपरी प्रतिनिधी.

सचिन कुंभार 

---------------------------------

हुपरी ता हातकणंगले  शिवमहोत्सव परिवाराचे अविरत कौतुकास्पद कार्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आणि 'शिवमहोत्सव परिवार'च्या ११ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हुपरी येथे भव्य रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवमहोत्सव परिवार आणि बापूसाहेब विष्णू शेटके (BVS) ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या शिबिराचे उद्घाटन हुपरी पोलीस स्टेशनचे पी. एस. आय. श्री. सत्यवान हाकेसाहेब यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी श्री बी.व्ही.एस. ज्वेलर्सचे मालक श्री. शिवाजीराव शेटके यांनी श्रीफळ वाढवून शिबिराचा रीतसर प्रारंभ केला.या सामाजिक उपक्रमाला शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेटी देऊन प्रोत्साहित केले. यावेळी 

 श्री. मंगलराव माळगे (नगराध्यक्ष)श्री. रमेशराव भोरे (उपजिल्हाध्यक्ष, हिंदू महासभा)श्री. नितीनराव काकडे (तालुका कार्यवाहक, हिंदूराष्ट्र समन्वय समिती)श्री. सात्तप्पा गायकवाड (अध्यक्ष, मराठा समाज)श्री. संदीप आपटे (बांधकाम सभापती, हुपरी नगरपरिषद)

 डॉ. स्वप्नील हुपरीकर (नगरसेवक), सौ. रूपाली अजित उगळे (नगरसेविका), सौ. सरिता नागेश कौंदाडे (नगरसेविका)

 * तसेच श्री. मोहनराव बाईंगडे, श्री. रवी चिटणीस, श्री. अमित बाईंगडे, श्री. वैभव लायकर, श्री. प्रशांत साळोखे (बजरंग दल), श्री. बंडोपंत फिरगाण (माजी अध्यक्ष, वीर सेवा दल), श्री. चंद्रशेखर नाईक, श्री. दिनकर ससे, श्री. नेताजी निकम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.शिवमहोत्सव परिवार ही संस्था गेल्या दहा वर्षांपासून समाजात विधायक आणि समाजोपयोगी कार्य करत आहे. ही संस्था स्वतः ब्लड बँक नसली तरी, कोणत्याही रुग्णास गरजेच्यावेळी  तात्काळ आणि मोफत रक्त  उपलब्ध करून देण्यासाठी सदैव तत्पर असते. संस्थेच्या या निस्वार्थी कार्यामुळे हुपरी आणि परिसरातील नागरिकांच्या मनात संस्थेविषयी विश्वासाचे आणि आदराचे स्थान निर्माण झाले आहे.

या शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक रक्तदात्याला शिवमहोत्सव परिवारातर्फे आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. 'क्षण कोणताही... सदैव सेवेसाठी तत्पर' हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

No comments:

Powered by Blogger.