Header Ads

मुरगूड नगरपालिकेच्या अन्यायकारक घरफाळा वाढीविरोधात नागरिक आक्रमक.....

मुरगूड नगरपालिकेच्या अन्यायकारक घरफाळा वाढीविरोधात नागरिक आक्रमक.....

------------------------------

मुरगूड/ जोतीराम कुंभार.

------------------------------

     मुरगूड नगरपालिकेने प्रशासक काळात कोणतीही पूर्वसूचना अथवा जनतेशी चर्चा न करता केलेली २० टक्के घरफाळा वाढ तसेच भाडेपट्टी वाढ अन्यायकारक असून ती तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मुरगूड शहरातील नागरिकांनी दिला आहे. यासंदर्भातील निवेदन नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, प्रशासक काळात नागरिकांना विश्वासात न घेता घरफाळा व भाडेपट्टी वाढ करण्यात आली. याची माहिती सर्वसाधारण सभेनंतर जनतेसमोर आली. त्यातच यंदा पुन्हा ५ टक्के घरफाळा वाढीचा प्रस्ताव दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सध्या वाढती महागाई, युद्धजन्य परिस्थितीमुळे वाढलेले दर आणि आर्थिक अडचणी यामुळे सर्वसामान्यांचे जीवन कठीण झाले आहे. मुरगूड हे क वर्ग नगरपालिका क्षेत्र असले तरी येथील अनेक नागरिक शेती व किरकोळ व्यवसायावर अवलंबून असल्याने ही वाढ त्यांना परवडणारी नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच वाढीव दराने ज्या नागरिकांकडून घरफाळा व भाडेपट्टी वसूल करण्यात आली आहे, त्यांची रक्कम परत करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला.

सदर निवेदन मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांनी स्वीकारले. यावेळी नगरसेवक सुहास खराडे, माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले, बाळासो सूर्यवंशी, राजेंद्र चव्हाण, सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, अँथोनी बारदेस्कर सुशांत मांगोरे, संदीप उर्फ गब्बर भारमल विठ्ठल भुते, गोविंद पाटील, सुरेश शिंदे, निवास कुंभार, अमर इंदलकर, आदी उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.