भोगावती-राधानगरी मार्गावर भीषण अपघात; कौलव येथील साताप्पा कांबळे गंभीर जखमी.
भोगावती-राधानगरी मार्गावर भीषण अपघात; कौलव येथील साताप्पा कांबळे गंभीर जखमी.
------------------------
राधानगरी प्रतिनिधी :
विजय बकरे.
------------------------
भोगावतीकडून राधानगरीकडे येणाऱ्या भरधाव स्विफ्ट कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कौलव येथील साताप्पा परसू कांबळे (वय अंदाजे ५५) हे गंभीर जखमी झाले. हा अपघात भोगावती-राधानगरी मार्गावर घडला असून घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साताप्पा कांबळे हे आपल्या मोटारसायकलवरून कौलवकडे जात असताना भरधाव स्विफ्ट कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कांबळे हे रस्त्यावर ओढले गेले. त्याचवेळी राधानगरीहून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली त्यांचा पाय सापडल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
अपघात इतका भीषण होता की काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमी साताप्पा कांबळे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

No comments: