संत निरंकारी फाउंडेशनतर्फे ओतूर येथे रक्तदान शिबीर व सत्संग संपन्न; ७५ जणांचे रक्तदान
संत निरंकारी फाउंडेशनतर्फे ओतूर येथे रक्तदान शिबीर व सत्संग संपन्न; ७५ जणांचे रक्तदान.
-------------------=----------------आळेफाटा (प्रतिनिधी:) 'नर सेवा, नारायण पूजा' आणि 'रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नाही' या ब्रीदवाक्याला जागून संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने ओतूर(ता. जुन्नर )येथे भव्य रक्तदान शिबीर व आध्यात्मिक सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . या उपक्रमात अंदाजे ७५ निरंकारी भक्त व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदानाला सहभाग नोंदवला आहे.
शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले व प्रवीण भांबुर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आल्याची माहिती मनोज तांबे यांनी दिली . यावेळी उपस्थित भाविकांना भांबूर्डेकर म्हणाले की संकट काळात संत निरंकारी मिशन नेहमीच समाजाच्या पाठीशी उभे राहते. संकलित झालेले ७५ युनिट रक्त संत निरंकारी ब्लड बँक, विलेपार्ले, मुंबई यांच्या वैद्यकीय पथकाने संकलित केले आहे .
सायंकाळी झालेल्या सत्संग सोहळ्यात मुंबईहून आलेले प्रचारक सोहन इंगवले यांनी मार्गदर्शन केले. "अध्यात्म केवळ वर्षांचे नाही, तर तो अंतरीच्या प्रवासाचा मार्ग आहे. आपण देवाच्या किती जवळ पोहोचलो हे महत्त्वाचे आहे. वर्ष मोजण्यापेक्षा अंतर्गत बदल महत्त्वाचा असे प्रतिपादन त्यांनी केले .
सद्गुरु सुदीक्षा महाराज यांच्या शिकवणीचा दाखला देत ते म्हणाले, "घरातील पत्नी, मुलांमध्ये विठ्ठल दिसतो का, कामात परमात्म्याची जाणीव होते का, हीच खरी कसोटी आहे. ब्रह्मवेत्त्या सद्गुरूंकडून ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यावरच सर्वांमध्ये भगवंताचे रूप दिसते." असेही ते या वेळी म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल डोके यांनी केले तर आभार मनोज तांबे यांनी मानले.

No comments: